सोशल मीडियावर मराठी मजकुराचं इंग्लिश भाषांतर येतं, ते फार चुकीचं असतं, पण त्यात नंदा खरे यांचं भाषांतर ‘Nanda is True’ असं येतं…. अन् ते सत्य आहे!
नंदा खरे यांचं असं तर्कशुद्ध लेखन वाचून मीडिऑकर झापडबंद आयुष्याला सोकावलेलं डोकं थाऱ्यावर येतं. उघड्या डोळ्यासमोर असलेल्या अज्ञानाच्या, गैरसमजाच्या पडद्याला भसाभस भोकं पडू लागतात आणि समोरचं स्वच्छ दिसायला लागतं. आणि आठवत राहतात बा.सी. मर्ढेकरांच्या ‘भंगू दे काठिण्य माझे’ कवितेतील चार ओळी.......